गोव्यात पिटबुल आणि रॉटविलर जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
यामध्ये जिवाला धोका निर्माण करणाऱ्या 17 आक्रमक कुत्र्यांच्या जातींचा समावेश आहे.
या कुत्र्यांकडून वारंवार हल्ले झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता संबंधित जातींचे पाळीव प्राणी घरात ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कुत्र्यांचे हल्ले वाढल्यानंतर फेब्रुवारीमध्ये लोकांनी अशा कुत्र्यांवर बंदीची मागणी केली होती त्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
आधीपासून या जातीचे कुत्रे पाळणाऱ्यांनी त्यांची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यांच्यावर काही अटी लागू होतील.
या कुत्र्यांना बाहेर नेताना तोंडावर जाळी आणि साखळी लावणे बंधनकारक आहे .