रिझर्व्ह बँकेने कठोर नियम लागू करूनही सोन्याच्या कर्जात प्रचंड वाढ झाली आहे.
सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळे लोक बँका आणि एनबीएफसींकडून सोने गहाण ठेवून कर्ज घेत आहेत.
आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या मासिक बुलेटिननुसार, चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत सोन्यावर कर्ज घेण्याचे प्रमाण तब्बल 122 टक्क्यांनी वाढले आहे.
यावर्षी जुलैपर्यंत बँका आणि एनबीएफसींनी 2.94 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने कर्ज वाटले आहे.
गेल्या वर्षी जुलैपर्यंत सोने कर्ज घेण्याचा हा आकडा 1.32 लाख कोटी रुपये होता.
गेल्या वर्षीही सोन्याच्या कर्जात 44 टक्के वाढ झाली होती, ग्रामीण आणि निम-शहरी भागात वाहन कर्जे आणि सोन्याच्या तारण कर्जामध्ये सर्वाधिक वाढ झाली.
लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोने गहाण ठेवत आहेत, असं चित्र पाहायला मिळत आहे.