विकास

महिला आणि मुलींच्या विकासाच्या दृष्टीनं भारत आणि महाराष्ट्र शासन नेहमीच काही योजना राबवत असतं. विविध राज्यांमध्येही अशाच योजना राबवल्याचं पाहायला मिळतं.

मुलींना शिक्षणाचा अधिकार

या सरकारी योजनांमुळं मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासोबतच त्यांना उच्चशिक्षणासाठीचं अनुदान मिळतं आणि आर्थिक नियोजनामध्येही बरीच मदत होते. मुलींना उज्वल भविष्य मिळावं या हेतूनं शासनानं राबवलेल्या योजनांमुळं पालकांनाही लेकिच्या भविष्याच्या दृष्टीनं आखणी करणं सोपं जातं.

सुकन्या समृद्धी अल्पबचत योजना

यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी अल्पबचत योजना. मुलीच्या जन्मापासून 10 वर्षांपर्यंत या योजनेअंतर्गत पालक मुलीच्याच नावानं खातं उघडू शकतात. किमान 250 रुपयांमध्ये तुम्ही इथं खातं उघडू शकता.

गुंतवणूक

या योजनेअंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ज्यावर साधारण 8 टक्के दरानं व्याज मिळतं. 21 वर्षांनंतर तुम्हाला ही रक्कम काढता येते.

लेक लाडकी योजना

Maharashtra Lek Ladki Yojana 2023 या योजनेअंतर्गतही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मदत दिली जाते.

राज्य शासनाची मदत

या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंतची गुंतवणूक करता येते. राज्य शासन यामध्ये मोठी मदत देऊ करतं. जिथं मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 5 हप्त्यांमध्ये 75000 रुपये एकरकमी दिले जातात.

उडान योजना

(UDAN) उडान योजना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सुरु करण्यात आली आहे. शालेय शिक्षणासोबतच अभियांत्रिकी परीक्षांमधील अंतर कमी करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

इयत्ता 10 वीमध्ये 70 टक्के, गणित आणि विज्ञान 80 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असतील. यासाठी www.cbseacademic.in आणि www.cbse.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावा.

संकेतस्थळं

इयत्ता 10 वीमध्ये 70 टक्के, गणित आणि विज्ञान 80 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असतील. यासाठी www.cbseacademic.in आणि www.cbse.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावा.

राष्ट्रीय योजना

केंद्र शासनानं 2008 मध्ये मुलींच्या प्रोत्साहनासाठी राष्ट्रीय योजना सुरु केली असून, आठवी उत्तीर्ण विद्यार्थिनींना याचा फायदा मिळतो. जिथं केंद्र शासनाकडून मुलींच्या नावावर 3 हजार रुपये जमा करतं. मुलीचं वय 18 वर्षे होताच ही रक्कम व्याजासह दिली जाते.

VIEW ALL

Read Next Story