या व्यक्तीला विचारल्याशिवाय मुकेश अंबानी घेत नाही एकही निर्णय; ही व्यक्ती कोण?

Swapnil Ghangale
Nov 21,2023

अंबानींचे अध्यात्मिक गुरु

अंबानी कुटुंब हे भारतामधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असून सामाजिक स्तरावरही त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या या यशामागे आहेत त्यांचे एक अध्यात्मिक गुरु!

या व्यक्तीचं नाव काय?

रमेशभाई ओझा म्हणजेच भाईश्री महाराज असं या अध्यात्मिक गुरुंचं नाव आहे. अंबानी कुटुंबाला मार्गदर्शन करण्यात आणि सल्ला देण्याबरोबरच कुटुंबाच्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

1957 साली जन्म

1957 साली गुजरातमधील एका छोट्याश्या गावी रमेशभाई ओझा यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच ते अध्यात्माकडे ओढले गेले. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी गीतेची पारायणं केली.

मुंबईत शिक्षण

रमेशभाई ओझा यांनी मुंबईमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुष्य धार्मिक गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या अभ्यासाठी वाहून घेतलं.

त्या कार्यक्रमानंतर अंबानींचे निकटवर्तीय झाले

काही वर्षांपूर्वी अंबानींच्या घरी रामकथेचं कथन केल्यानंतर रमेशभाई ओझा हे अंबानी कुटुंबियांच्या निकटवर्तियांपैकी एक झाले.

कोकिलाबेन यांचा विश्वास

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये संपत्तीचं वाटप झालं तेव्हा कोकिलाबेन अंबानी यांनी रमेशभाई ओझांचा सल्ला घेतला होता. कुटुंब तुटू नये अशी कोकिलाबेन यांची इच्छा होती. आज दोन्ही भाऊ कोकिलाबेन यांचा सांभाळ करतात.

प्रकाशझोतात येणं टाळतात

रमेशभाई ओझा प्रसारमाध्यमांसमोर किंवा प्रकाशझोतात येणं टाळतात. मात्र ते कौटुंबिक सल्लांबरोबरच मुकेश अंबानींना उद्योग आणि व्यवसायिक सल्लेही देतात.

अनेक कार्यक्रमांना असतात उपस्थित

अंबानींच्या अनेक मुख्य कार्यक्रमांमध्ये रमेशभाई ओझा दिसून येतात. निता अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा आणि राधिका मर्चंड यांचं अरंगेत्रमच्या कार्यक्रमात रमेशभाई ओझा आले होते.

VIEW ALL

Read Next Story