भारतीय रेल्वे हे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
देशात सध्या 7300 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.
यापैकी काही स्थानकं अत्यंत भयावह मानली जातात.
आज आपण भारतातील अशाच काही रेल्वे स्थानकांविषयी जाणून घेणार आहोत. जिथे लोक जायला देखील घाबरतात.
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात असलेले बरोग रेल्वे स्थानक झपाटलेले मानले जाते. येथील बोगद्याजवळ एक अभियंता आत्महत्या केल्याची कथा प्रसिद्ध आहे आणि त्याचा आत्मा आजही इथे भटकत असल्याचे स्थानिक सांगतात.
पश्चिम बंगालमधील बेगुनकोदर रेल्वे स्थानक बराच काळ बंद होते. येथे एक पांढऱ्या साडीतील महिला दिसते. ही महिला एका अपघातात मृत्यूमुखी पडली असून तिचा आत्मा अजूनही येथे फिरतो, असे सांगितले जाते.
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज ऐकले असल्याचे दावे केले आहेत. रात्रीच्या वेळी प्रवाशांना विचित्र अनुभव आल्याचाही अनेकांनी सांगितला आहे.
प्रयागराजमधील नैनी रेल्वे स्थानकाजवळ ब्रिटिश कालीन कारावास होता. येथे छळ सहन केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा आत्मा अजूनही भटकत आहे असे म्हटले जाते. काही प्रवाशांना विचित्र हालचाली आणि आवाजही जाणवले आहेत.