हॅलीकॉप्टरमध्येही असतो का ब्लॅक बॉक्स? ज्यामुळे कळत अपघाताचं नेमकं कारण!

Pravin Dabholkar
Jun 15,2025


केदारनाथच्या गौरीकुंडजवळ हॅलीकॉप्टर क्रॅश होऊन 7 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 2 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.


रविवारी सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. हॅलीकॉप्टर केदारनाथहून भाविकांना घेऊन परतत होतं.


यामध्ये 12 जून 2025 ला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एआय 171 दुर्घटनाग्रस्त झाले. ज्यामध्ये 265 जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये 241 प्रवासी होते.


विमानातील ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर ताब्यात घेण्यात आलाय. यामुळे अपघाताचं नेमकं कारण कळणार आहे.


पण विमानाप्रमाणे हेलिकॉप्टरलादेखील ब्लॅकबॉक्स असतो का?


हो. हेलीकॉप्टरमध्ये ब्लॅक बॉक्स असतो. जो फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट वॉइस रेकॉर्ड (CVR) म्हणून ओळखला जातो.


एअरबस डॉट कॉमच्या माहितीनुसार, हेलीकॉप्टरमध्ये एक सिंगल कम्बाइंड रेकॉर्डर असतो. ज्यात उड्डाणाची वेळ, हेडिंग, उंची, पावर, तापमान, रोटर स्पीड, बाहेरचे तापमान रेकॉर्ड होत असते.


हॅलीकॉप्टर ब्लॅक बॉक्स 800 ते 1200 पॅरामीटर्स दरम्यान ट्रॅकींग करतो. हा ब्लॅक बॉक्स एका तासात 1100 सेल्सियस तापमान आणि 270 नॉट्स स्पीडची टक्कर सहन करु शकतो.


समुद्रात 14000 फूट खोलवर जाऊनही सिग्नल पाठवू शकतो. ज्यामुळे दुर्घटनेचे कारण कळण्यास मदत होऊ शकते.


भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी? हेदेखील कळते.

VIEW ALL

Read Next Story