चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. चांगली नोकरी मिळण्यासाठी तसे स्किल्स असणे आवश्यक असते.
बदलत्या काळाप्रमाणे नोकऱ्यांचे, कामाचे स्वरुपही बदलू लागले आहे.
एआय आल्यानंतर सर्वच क्षेत्रात महत्वाचे बदल पाहायला मिळतायत.
नोकऱ्यांच्या विश्वात खूप मोठा बदल होऊ लागलाय. 2025 मध्ये काही नोकऱ्या फार डिमांडमध्ये असणार आहेत.
वर्षानुवर्षे डिमांडमध्ये राहतील अशा 7 करिअरबद्दल जाणून घेऊया.
एआय हेल्थ सेवा ते ऑटोमेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल दिसतोय. यासाठी python, Tenserflow, डेटा मॉडलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यात तुम्हाला 25 ते 35 लाखांपर्यंत पगार मिळेल.
डेटा चोरी आणि सायबर हल्ले वाढू लागलेयत. त्यामुळे सायबर सिक्यूरिटी अॅनालिस्ट नोकरी डिमांडमध्ये आहे. यासाठी तुम्ही इथिकल हॅकिंग, नेटवर्क सिक्युरिटी, थ्रेट अॅनालिस्टचे ज्ञान असावे. तुम्हाला 15 ते 25 लाख पगार मिळेल.
डेटा सायंटिस्ट बनून तुम्ही चांगली कमाई करु शकता. तुम्हाला 15 ते 25 लाख पगार मिळेल.
हेल्थ केअर प्रोफेशनल्ससाठी तुमच्याकडे क्लिनिकल एक्सपर्टीस, डिजिटल हेल्थ सिस्टिमचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हाला 10 ते 15 लाख पगार मिळेल.
रिन्यूएबल एनर्जी रिसोर्स क्षेत्रात तुम्हाला 10 ते 30 लाखपर्यंत पगार मिळेल. तुमच्याकडे सोलार टेक, विंड सिस्टिम,एनर्जी स्टोरेजचे ज्ञान असावे.
सॉफ्टवेअर डेव्हलपर (मोबाईल अॅण्ड क्लाऊड) करिअर डिमांडमध्ये आहे. जावास्क्रिप्ट, React, AWS, मोबाईल डेव्हलपमेंटचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 15 ते 20 लाख पगार मिळू शकणार आहे.
डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्टसाठी तुमच्याकडे एसईओ,पेड अॅड्स, कंटेंट,स्टॅटर्जी अॅनालिस्टचे ज्ञान असावे. यात तुम्हाला 8 ते 15 लाखपर्यंत पगार मिळेल.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)