चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. पण सर्वांकडेच डिग्री, डिप्लोमा असतोच असं नाही.
आज आपण अशा 7 भरघोस पगार देणाऱ्या नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यासाठी डिग्रीची आवश्यकता नाही.
इलेक्ट्रीशियन इलेक्ट्रिकल सिस्टिम बसवतात, रिपेअर आणि मेंटेन करतात. अप्रेंटिसच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग मिळतं. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर चांगल्या कमाईच्या संधी येतात.
कमर्शियल पायलटसाठी कोणत्या डिग्रीची गरज नसते. पण ट्रेनिंग, सर्टिफिकेशन गरजेचे असते. चांगली एअरलाइन्स निवडून भरघोस पगार मिळवू शकता.
वेब डेव्हलपर्स वेबसाइट बनवतात आणि ती मेंटेन करतात. ते स्वत: शिकतात किंवा छोटा मोठा कोर्स करतात. अनुभव, कौशल्याने चांगली कमाई करता येते.
रियल इस्टेट एजंट ग्राहकांना मालमत्ता खरेदी, विक्री आणि भाड्याने देण्यासाठी मदत करतात.यासाठी डीग्रीची गरज नाही. फक्त परवाना हवा. एजंट्सना चांगले कमिशन मिळते.
प्लंबर पाणी, गॅस, पायपिंग सिस्टिंग इन्स्टॉल, देखभाल करतात. यांनादेखील ट्रेनिंग दिली जाते.
कंस्ट्रक्शन मॅनेजर बांधकाम कामांवर देखरेख ठेवतात. वेळेत आणि बजेटमध्ये काम पूर्ण करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी असते.
डेंटल हायजेनिस्ट दातांची स्वच्छता आणि संबंधित आजार शोधतात. यासाठी डीग्री, डिप्लोमाची आवश्यकता नाही.