सैनिक आपले प्राण पणाला लावून देशाची सेवा करतात. त्यामुळे प्रत्येकालाच सैनिकांबद्दल आदर असतो.
भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरात सैनिक आहे.
हे गाझीपूर जिल्ह्यात असून गहमर असे याचे नाव आहे.
या गावाची लोकसंख्या 1 लाख 35 हजार इतकी आहे. हे देशातलं सर्वात मोठं गाव आहे.
गावातील 30 हजार लोकांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून काम केलंय.
या गावात 15 हजार निवृत्त सैनिक असून साधारण 15 हजार सैनिक कार्यरत आहेत.
या गावाने भारताला 42 ब्रिगेडीयर दिले आहेत. 45 जण कर्नल पदावर काम करतायत.