मीर बाकीने तोडलं राम मंदिर, 'या' हिंदू राणीने केला त्याचा अंत

Pravin Dabholkar
Jan 22,2024


अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.


500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर प्रभू रामाच्या भक्तांनी हा सोहळा याची देही पाहिला.


पण 500 वर्षांपुर्वी राम मंदिर कोणी तोडलं होतं? त्याचे पुढे काय झालं?


कोण ती हिंदू राणी होती जिने राम मंदिर तोडणाऱ्याचा खात्मा केला.


याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


आजपासून 500 वर्षे आधी 1527 ते 1529 दरम्यान बाबरचा सरदार मीर बाकीने राम मंदिर तोडलं


त्यावेळी राम मंदिर वाचवण्यासाठी हंसवर राज्याचे राजा रणविजयदेखील निघाले.


कमी सैन्य असल्याने ते बाबरच्या सैन्यापुढे टिकाव धरु शकले नाहीत आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली.


यानंतर राजा रणविजय यांची पत्नी महाराणी जया कुमारी यांनी राम मंदिर वाचवण्याची शपथ घेतली.


यानंतर त्यांनी छोट्या सैन्यासह बाबरशी युद्ध केले. या युद्धात बाबरचा सरदार मीर मारला गेला.


बाबरला ही बातमी कळताच त्याने पलटवार केला. यात महाराणीला वीरगती प्राप्त झाली.

VIEW ALL

Read Next Story