माश्यांपासून होणारा रोगप्रसार आणि तत्सम प्रकारांमुळंही त्या दूर राहिलेल्या बऱ्या असाच अनेकांचा सूर असतो. पण, या प्रयत्नांमध्ये मात्र वारंवार अपयश येतं.
घाणीवर बसणाऱ्या या माश्या घरात आल्यानंतर त्या विविध वस्तूंवर आणि अनेकदा खाद्यपदार्थांवरही बसतात त्यामुळं त्यांच्यावाटे बरेच सूक्ष्म रोगजंतू या पदार्थांपर्यंत पोहोचून त्यावाटे आपल्या पोटात जाण्याची भीती असते.
रोगजंतू खाण्यावाटे पोटात गेल्यास अतिसार, गॅस्ट्रोइंट्रीटीस, टायफॉईड यांसारख्या व्याधी जडतात. परिणामी या माश्यांना पळवून लावण्यासाठी नेमका काय उपाय करावा? हाच प्रश्न पडतो.
घरात माश्या झाल्या असल्यास कापूरवडी तेलात कुस्करून त्यात दोन तमालपत्राची पानं जाळून टाका. पानाचं लहानसं टोक पेटवल्यास ते धुमसत राहील आणि कापराच्या धुरानं माश्या पळून जातील.
बोरिक पावडर, पीठ आणि तेल असं मिश्रण एकत्र करून ते व्यवस्थित मळा आणि त्याचे लहानसे गोळे सिंक, खिडक्यांच्या कोपऱ्यापुाशी ठेवा. किडे आणि माश्या ते खाऊन पुन्हा घरात येणार नाहीत.
4 ते 5 चमचे व्हिनेगर, 1 चमचा कापराची पूड, डेटॉल, मीठ हे मिश्रण एकत्र करून त्यात 1 ग्लास पाणी मिसळा आणि स्प्रे बॉटलच्या सहाय्यानं ते घरात फवारा. किटक असणाऱ्या भागावरही ते फवारल्यास माश्या किटकांचा नायनाट होतो.
घरात माश्या आणि किटक, चिलटे सहसा अस्वच्छतेमुळंही येतात. त्यामुळं सहसा शेगडी, सिंक, बाथरूमपाशी असणारी पायपुसणी स्वच्छ आणि कोरडी ठेवा.
कचरा पेटीमध्ये पाणी सांडून त्याचा कुजका वास येणार नाही याची काळजी घ्या. कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावा.
माश्या सतत घरात येत असल्यास पंख्याचा वेग जास्त ठेवा. घरात नैसर्गित धूप लावा.
मच्छरदाणी किंवा बारीक छिद्रांची जाळी लावूनही तुम्ही घरात येणाऱ्या माश्या आणि किटकांची वाट अडवू शकता.