भारतात हापूस, दसरी, केशर यांसारख्या आंब्याच्या अनेक जाती आहेत.
मात्र, लंगडा आंबा आपल्या अनोख्या नावामुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेतो.
अनेक अहवालांमध्ये असं सांगितलं जातं की लंगडा आंब्याचा उगम उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात झाला आहे. त्यामुळे या आंब्याला हे नाव मिळालं.
असे म्हटले जाते की, वाराणसीमध्ये एका पायाने अपंग असलेला एक माणूस राहत होता. त्याच्या घराच्या अंगणात एक आंब्याचं झाड होतं.
त्या झाडाला आलेल्या आंब्याची चव आणि सुगंध इतर आंब्यांपेक्षा खूप वेगळा होता. लोकांनी ते आंबे चाखल्यानंतर त्याला 'लंगडा आंबा' असं नाव दिलं.
चौंसा आंब्याप्रमाणेच लंगडा आंबाही केसाळ नसतो, तर अतिशय मऊ आणि गोड असतो. त्याचा सुगंधही खूप चांगला असतो.
लंगडा आंब्याची लागवड उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमध्ये होते. हा आंबा सर्वाधिक प्रमाणात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खाल्ला जातो.