पाचव्या शतकाच्या आसपास भारतात असं पुस्तक लिहिलं गेलं ज्याने जगभरात खळबळ माजवली. याचं नाव होतं कामसूत्र.
2 हजार वर्षानंतरही सेक्स संदर्भात माहिती देणाऱ्या पुस्तकाची चर्चा होते. महर्षी वात्सायन यांनी हा ग्रंथ लिहिला होता.
वात्सायन हे प्रसिद्ध ऋषी होते. त्यांचा जन्म गुप्त वंशावेळी झाला. त्यांना वेदांचं ज्ञान होतं. त्याचा जास्त काळ बनारसमध्ये गेला.
वात्सायन हे आजीवन ब्रम्हचारी राहिले. असे असतानाही त्यांनी कामसूत्र ग्रंथ कसा काय लिहिला? असा प्रश्न विचारला जातो.
इतिहासकारांच्या मते, वास्तायन यांनी विचार केला की सेक्सवर चर्चा व्हायला हवी. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
त्यावेळी सेक्स विषयावर कोणता ग्रंथ नव्हता. त्याबद्दल माहिती देणारी कोणती व्यवस्था नव्हती. या ग्रंथामुळे लोकांच्या ज्ञानात भर पडली.
आयुष्यात एकदाही सेक्सचा अनुभव न घेता वात्सायन यांनी हा ग्रंथ लिहिला. ज्याला सेक्ससंदर्भातील माहितीसाठी सर्वात प्रामाणिक ग्रंथ म्हटलं गेलं.
प्रसिद्ध लेखिका वेंडी डोनिगर यांच्या रिडमिंग द कामसूत्रा या पुस्तकानुसार, वात्सालय नियमित वेश्यालयात जायचे. तिथे चोरुन लोकांना सेक्स करताना पाहायचे.
त्यांनी आपल्या केवळ निरीक्षणातून कामसूत्र ग्रंथाची निर्मिती केली. सध्या जगभरात प्रत्येक सेकंदाला 1.5 कोटी लोक गुगलवर कामसूत्र सर्च करतात.