तुम्ही वापरत असलेल्या चलनी नोटा कागदाच्या असतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात.
वेगवेगळ्या देशांमध्ये चलनी नोटा वेगवेगळ्या साहित्यापासून बनलेल्या असतात. भारतातील नोटा कशाने बनतात?
भारतीय चलनी नोटा कागदापासून बनवल्या जात नाहीत तर कापडासारख्या मिश्रणापासून बनवल्या जातात.
भारतीय चलन कापूस आणि तागापासून बनवले जाते.
भारतीय नोटा 100 टक्के कापूस आणि तागापासून बनवल्या जातात. त्यामुळे त्या टिकाऊ राहतात आणि सहज फाटत नाहीत. पाणी, घामाने सहज खराब होत नाहीत.
यामध्ये वॉटर मार्क, सुरक्षा धागा, इंटॅग्लिओ प्रिंटिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यामुळे बनावट नोटा बनवणे कठीण होऊन जाते.
10,20,50,100 यासारख्या नोटांमध्ये वापरले जाणारे कापड आणि शाई भारत सरकारच्या विशेष सुरक्षा पेपर मिलमध्ये तयार केले जाते.
ऑस्ट्रिलिया, कॅनडा सारखे काही देश आता पॉलिमर (प्लास्टिकसारखे पदार्थ) पासून नोट्स बनवतात. ज्या अधिक टिकाऊ असतात.