एक काळ असा होता जेव्हा दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाचून व्हायची.
प्रत्येक गल्ली, इमारतीत पेपर वाटणारे दिसायचे. जे देशासह जगातील माहिती पोहोचवायचे.
पेपर विक्रेते जितके जास्त पेपर विकतील तितकी जास्त त्यांची कमाई होते.
सण, निवडणूक काळात त्यांची जास्त कमाई होते. या काळात वर्तमानपत्र जास्त विकलं जातं.
एका पेपर विक्रेत्याची कमाईदेखील चांगली व्हायची. कारण एका घरात एकापेक्षा जास्त पेपर घेतले जायचे.
पण आता स्वरुप बदललंय. लोकांच्या सकाळची सुरुवात पेपरऐवजी मोबाईल पाहून होते.
टीव्ही चॅनलवर प्रत्येक मिनिटाला ब्रेकींग न्यूज येते त्यामुळे दैनिकांची भूमिका हळुहळू कमी होतेय.
ज्या पेपर विक्रेत्यांची कमाई हजार रुपयांमध्ये व्हायची ती आता 100 रुपयांवर आलीय. काही ठिकाणी अर्ध्याहून कमी कमाई होते.
आधी 200-300 वर्तमानपत्र विकून 500 ते 1000 रुपये कमाई व्हायची. ती आता 100 ते 150 रुपये इतकी होते.
महागईमुळे अनेकांनी वर्तमानपत्र घेणं बंद केलंय,याचा परिणाम वर्तमानपत्र विक्रेत्यांवर झालाय.
त्यामुळे दैनिक विकणारेसोबत दूधदेखील विकू लागले. ऑनलाईन डिलीव्हरी करु लागले. तर काहींनी दुसऱ्या नोकऱ्या शोधल्या.
कोणत्या दैनिकाची किंमत 5 ते 8 रुपये असेल तर विक्रेत्याला दीड ते अडीच रुपये मिळतात.
म्हणजेच प्रत्येक दैनिकामागे त्यांची 1 ते 2 रुपये इतकीच कमाई होते.