देशाच्या पंतप्रधानांचं पर्सनल सेक्रेटरी हे एक प्रशासकीय पद असतं. पर्सनल सेक्रेटरी हा पंतप्रधानांचे दैनंदिन काम आणि अधिकृत कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करतो.
2014 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी (पर्सनल सेक्रेटरी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पर्सनल सेक्रेटरी हा केवळ पंतप्रधानांचे कार्यक्रम आणि सभांचे व्यवस्थापनच करत नाही, तर सरकारी धोरणांमध्ये सुसूत्रता आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
तेव्हा पंतप्रधान मोदींच्या पर्सनल सेक्रेटरीला महिन्याला किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदींच्या पर्सनल सेक्रेटरीचा पगार हा सरकारद्वारे ठरवलेली वेतनश्रेणी आणि भत्त्यांवर अवलंबून असतो. यापदासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली जाते.
पंतप्रधान मोदींच्या पर्सनल सेक्रेटरीचा पगार हा दरमहा 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये असतो. याशिवाय त्यांना सरकारी निवासस्थान, गाडी, आरोग्य सुविधा आणि इतर सरकारी भत्ते सुद्धा मिळतात. परदेश दौरे आणि इतर अधिकृत प्रवासाचा अतिरिक्त लाभही अधिकाऱ्याला देण्यात येतो.