अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी होण्यासाठी घऱबसल्या बनवा पास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जर तुम्हालाही अयोध्येतील राम मंदिराच्या आरतीत सहभागी व्हायचं असेल तर घरबसल्या पास तयार करु शकता.

यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. तुम्ही https://srjbtkshetra.org/ वर जाऊन पास तयार करु शकता.

या लिंकवर गेल्यानंतर आरक्षित पाससाठी लिंकवर क्लिक करावं लागेल. यानंतर दुसरं पेज ओपन होईल, जिथे तारीख निवडण्याचा पर्याय असेल.

यानंतर आरतीचे पर्याय येतील, त्यातून निवड करा.

यानंतर मोबाइल नंबर टाकून ओटीपी मिळवावा लागेल.

ओटीपी टाकल्यानंतर तुमचं नाव, पत्ता, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यासंबंधी माहिती द्यावी लागेल.

यानंतर तुमच्या जिल्ह्याची माहिती द्यावी लागेल.

यानंतर फोटो अपलोड करावा लागेल.

ही सर्व माहिती सबमिट केल्यानंतर तुम्ही पासची प्रिंट घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story