तुम्ही जर स्वस्तात प्रवास करु इच्छिता तर, अशा वेळी प्रवासाच्या तारखा बदलण्यासाठी तयार राहा. थोडक्यात जेव्हा पर्यटकांचा ओघ कमी असतो तेव्हाच ठराविक भागांना भेट द्या, विमान तिकिटांचा खर्च कमी होईल.
अनेक अॅप, क्रेडिट कार्ड आणि बँका तुम्हाला विविध विमान प्रवासांवर अनेक सवलती देतात. त्यामुळं या सवलतींवर सतत नजर ठेवणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.
बऱ्याचदा अमुक एका ठिकाणी थेट पोहोचण्यासाठी एकाच विमानाचा पर्याय निवडला जातो. पण, अशा वेळी तुम्ही शक्य असल्यास प्रवासाचा पहिला टप्पा ट्रेन आणि त्यापुढील टप्पा विमान प्रवासानं पूर्ण करु शकता.
तुम्ही जाताय त्या ठिकाणची सविस्तर माहिती मिळवून तिथं जाण्यासाठीचा उत्तम वेळ आणि तिकीट बुकींगसाठीच्या वेळा यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळवा.
अनेकदा शेवटच्या क्षणीसुद्धा तिकीट काढल्यास तुम्ही फायद्यात असू शकता. यावेळी मध्यरात्रीनंतर तिकीट बुक करण्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.
प्रवासाच्या तारखेच्या बरंच आधी तिकीट काढा. त्यातही Off season तिकीट काढल्यामुळं तुमचा बराच फायदा होईल. इथं किमान 3 ते 6 महिन्यांचा काळ फायदेशीर ठरतो.
अविश्वसनीय सवलतींसह कमी दरात कसं बुक कराल विमानाचं तिकीट?