जीर्ण, फाटलेल्या नोटा कशा बदलायच्या? पाहा RBI चा नियम
नकळतच व्यवहारांदरम्यान आपल्याकडे आलेल्या या फाटक्या नोटा नेमक्या काय करायच्या, त्या आता कोण घेणार? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
आता मात्र ही चिंता नसावी. कारण, कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेमध्ये तुम्हाला या नोटा बदलून मिळू शकतात. कोणतीही बँक या नोटा नाकारु शकत नाहीत.
RBI कडून या नोटांच्या अदलाबदलीसाठी काही नियम आखण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही एका वेळी फक्त 20 नोटा बदलू शकता.
तुम्ही बदलत असणाऱ्या नोटांची एकूण रक्कम 5 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी.
बँक लगेचच तुमच्याकडील जीर्ण, फाटलेल्या नोटा स्वीकारून त्याच रकमेच्या सुस्थितीत असणाऱ्या नोटा तुम्हाला परत देईल.
महत्त्वाची बाब म्हणजे बँकेकडून नोटा बदलून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाढीव रक्कम आकारली जाणार नाही.
थोडक्यात अनधिकृत पद्धतीनं फाटलेल्या नोटा बदलून स्वत:चं नुकसान करून घेण्यापेक्षा बँकांमध्ये जाऊन फायद्यात राहा.