नोटा बदलण्यासाठी गर्दी करु नका

नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करु नका. त्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे, असं आवाहन आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी केलं आहे.

कागदपत्रं लागणार का?

2 हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रं सादर करण्याची गरज नाही असं असबीआयने सांगितलं आहे.

कधीपर्यंत नोटा बदलून मिळणार?

30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांनी 2 हजारांच्या नोटा बदलून घ्याव्यात असं आवाहन आरबीआयने केलं आहे.

नोटा बदलण्याची सुरुवात कधीपासून?

23 मे पासून बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.

2 हजारांच्या नोटा जमा करु शकता

2 हजार रुपयांच्या नोटा आपलं खातं असलेल्या बँकेत जाऊन खात्यामध्ये जमा करु शकता.

एका दिवसात किती वेळा बदलता येणार नोटा?

एका वेळेस 10 नोटा याप्रमाणे दिवसभरात एका व्यक्तीला कितीही वेळा नोटा बदलून दिल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जास्तीत जास्त 20 हजार

एकावेळी 20 हजार रुपयांची रक्कम 2 हजारांच्या चलनात स्वीकारुन त्या नोटा बदलून दिल्या जातील.

नोटा बदलण्याचं लिमीट किती?

एक व्यक्ती 2 हजारांच्या 10 नोटा एकावेळी बदलून घेऊ शकते.

आरबीआयच्या ऑफिसमध्येही बदलता येतील नोटा

आरबीआयच्या कोणत्याही रिजनल ऑफिसमध्ये जाऊन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेता येतील. आरबीआयची देशात एकूण 19 रिजन ऑफिसेस आहेत.

खातं असणं आवश्यक नाही

ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्याच बँकेतून तुम्हाला नोटा बदलून मिळत असं काहीही नाही. तुमच्या सोयीनुसार जवळच्या कोणत्याही बँकेत तुम्ही नोटा बदलण्यासाठी जाऊ शकता.

कोणत्याही बँकेमध्ये बदलून घेऊ शकता नोटा

तुम्ही तुमच्या घराच्या जवळ असलेल्या कोणत्याही बँकेमधून 2 हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता.

2 हजारांच्या नोटा कधी? कुठे? कशा? एकावेळेस किती बदलून मिळतील असे प्रश्न तुम्हाला पडलेत का?

VIEW ALL

Read Next Story