1. मतदार ओळखपत्र क्रमांक 2.आधार कार्ड 3. नोंदणीकृत मोबाइल आणि ईमेल
सर्वप्रथम, तुम्हाला NVSP https://www.nvsp.in/ किंवा मतदार सेवा पोर्टल https://voters.eci.gov.in/ च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन लॉग इन आणि साइन अप करावे लागेल.
जर तुम्ही नोंदणी केली असेल, तर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर अकाउंट लॉगिनसाठी OTP टाका. तुम्ही नोंदणीकृत नसल्यास, 'साइन-अप' वर क्लिक करा.
यानंतर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि Continue वर क्लिक करा. यानंतर तुमचे नाव आणि पासवर्ड टाकून OTT टाका.
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. यानंतर साइनअप प्रक्रिया पूर्ण होईल.
खाली स्क्रोल करा आणि आधार संग्रह पर्यायावर क्लिक करा आणि फॉर्म 6B भरा. यानंतर आधार आणि निवडणूक फोटो ओळखपत्र आवश्यक असेल.
यानंतर EPIC क्रमांक प्रविष्ट करा, जो तुमच्या मतदार आयडीवर नोंदणीकृत आहे. यानंतर 'Verify & Fill Form' वर क्लिक करा.
यानंतर, तुमची पसंतीची भाषा निवडून फॉर्म भरा.
नंतर 'Next' पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर 'फॉर्म 6B' भरा आणि आवश्यक कागदपत्रे भरा.