कोणते नागरिक आयुष्मान कार्ड बनवण्यास अपात्र?

Sayali Patil
Feb 25,2026

आयुष्मान कार्ड

भारतीय नागरिकांना आयुष्मान कार्डअंतर्गत आरोग्य सुविधांवर आर्थिक सवलतींचा लाभ मिळतो.

नागरिक

मात्र सरसकट सर्व नागरिक हे कार्ड बनवण्यासाठी पात्र नसतात. नेमकं कोणत्या नागरिकांना आयुष्मान कार्ड बनवण्याची मुभा नसते, याबाबतही काही निकष आहेत.

आयकर

जी कुटुंब आयकर भरतात त्यांना आयुष्मान कार्ड बनवता येत नाही. शिवाय कुटुंबातील एखादी व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत असेल तरीही हे कार्ड बनवता येत नाही.

उत्पन्न

10 हजारांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आयुष्मान कार्ड बनवता येत नाही.

वाहन

ज्यांच्याकडे दोन, तीन किंवा चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टरसम वाहन आहे त्यांना ही सुविधा मिळत नाही. 5 एकर भूखंड किंवा त्याहून अधिक कृषीक्षेत्र असणाऱ्यांना हा लाभ घेता येत नाही.

फ्रीज, लँडलाईन फोन

फ्रीज, लँडलाईन फोन असणाऱ्यांनाही सहसा आयुष्मान कार्ड दिलं जात नाही.

पक्कं घर

पक्कं घर, तीन खोल्या किंवा त्याहून मोठं घर असणारे नागरिकही आयुष्मान कार्डासाठी अपात्र ठरतात.

VIEW ALL

Read Next Story