आपली गरज किंवा सोयीसुविधांसाठी आपण नवं घर, गाडी, बंगला घेतो.
यासाठी आपल्या बॅंका किंवा फायनान्स कंपन्यांकडून लोन घ्यावे लागते.
हे लोन कमी वेळात कसे संपेल या विचारात आपण असतो.
यासाठी कमी इंट्रेस्ट रेट असलेल्या बॅंका शोधतो. पण तुम्ही पुढील टिप्स वापरुन 25 वर्षांचे कर्ज 10 वर्षात फेडू शकता.
कर्ज हफ्त्यापेक्षा जास्त रक्कम कर्जात भरली असता कालावधी कमी होतो.
तुम्ही 25 वर्षांसाठी कर्ज घेतले असेल तर दरवर्षी मासिक देय 10 टक्क्यांनी वाढवल्यास कर्ज 9 वर्षे 11 महिन्यांत संपेल.
दरवर्षी मासिक देय 5 टक्क्यांनी वाढवल्यास कर्ज 12 वर्षे 11 महिन्यात संपेल.
दरवर्षी एक मासिक देय जास्त दिल्यास कर्ज 19 वर्षे 1 महिन्यात संपेल.
मासिक देय स्थिर ठेवलात तर तुमचे 25 वर्षांचे कर्ज फेडण्यासाठी तितकाच कालावधी लागेल.
आरबीआयच्या रेपो दरावरदेखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार इंट्रेस्ट रेटमध्ये बदल होऊ शकतो.