विनेगर आणि बेकिंग सोडा यांची पेस्ट बनवून जे डाग आहेत तिथे लावा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर ते साफ करा.
थोडी टूथपेस्ट घ्या आणि ती नळावर लावून ब्रशनं चांगली धुवून काढा.
बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस घ्या त्याची एक पेस्ट बनवा आणि त्या डागांवर लावून काही काळानंतर धुवून काढा.
जुनी मेनबत्ती असेल तर ती नळावर घासा त्यानंतर कपड्यानं पुसून काढा.
टोमॅटो सॉस हा त्या डागांवर लावा आणि 20 मिनिटांनंतर त्याला घासून धुवून काढा.
लिंबाचा एक तुकडा घ्या आणि त्या भागावर मीठ लावून त्यानं नळ घासा त्यानं सोप्या पद्धतीनं डाग जातील. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)