शिफॉनच्या साडीचा ट्रेंड कधीही जुना होणार नाही. शिफॉन साडी हा एव्हरग्रीन ट्रेंड आहे. शिफॉनची साडी नेसल्यावर स्त्रीही अधिकच सुंदर भासते.
ऑफिस असो किंवा एखादा समारंभ या दोन्ही ठिकाणी शिफॉन साडीमुळं छान लुक येतो. हलकी आणि आरामदायी साडी असल्याने महिलांची पहिली पसंत ही शिफॉनची साडी असते. मात्र शिफॉनच्या साडीची काळजी घेणे हे खूप जास्त अवघड असते.
शिफॉनची साडी ही अन्य साड्यांच्या तुलनेत लवकर खराब होते. कारण साडीची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात नाही.
शिफॉनची साडी लाइट वेट असते त्यामुळं साडी धुण्यापर्यंत ते कपाटात ठेवण्यापर्यंत काही गोष्टींची विशेष खबरदारी घ्यावी लागते.
शिफॉनच्या साडीला जेव्हा धुळ किंवा खराब होईल तेव्हाच ती धुवा. पाण्यात डिटर्जेंट मिक्स करुन त्यात 15 मिनिटांसाठी साडी ठेवा. त्यानंतर 2-3 वेळा पाण्यातून व्यवस्थित काढून घ्या.
शिफॉनची साडी कधीच अन्य कपड्यांसोबत धुवू नका. जर दुसऱ्या कपड्यांचा रंग लागला तर तो निघणे खूप कठिण होऊन जाते.
साडी धुतल्यानंतर ती चुरगळु नका नाहीतर साडीवर सुरकुत्या पडतील. त्यामुळं उन्हात सुकवू नका तर पंख्याखाली सुकवण्यासाठी ठेवा.
शिफॉनच्या साडीला इस्त्री करण्याआधी त्यावर सूती कपडा ठेवा त्यानंतर वरुन इस्त्री फिरवा. लक्षात घ्या की, इस्त्रीचे तापमान कमीच ठेवा.
शिफॉनच्या साडीची व्यवस्थित घडी घालून न्यूजपेपरमध्ये ठेवून मगच कपाटात ठेवा