सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमधील व्हॉटस्अॅप अॅप ओपन करा.
त्यानंतर व्हॉटस्अॅप ओपन होताच होम स्क्रीनवर वरती दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यामधील सेटिंग पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही प्राइवेसी पर्यायावर क्लिक करा.
येथे तुम्हाला सुरुवातीला Last Seen and Online असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर Nobody ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये तुम्ही ऑनलाइन कधी दिसायचे हा पर्याय देखील निवडू शकता. ज्यामध्ये पहिल्याप्रमाणे Last seen ऑप्शन निवडू शकता.
या सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर कोणत्याही व्यक्तिला तुमचा Last Seen आणि तुम्ही Online आहात का नाही हे कळणार नाही.