रोपांची चांगली वाढ होऊ द्यायची असेल तर त्यांना नियमितपणे पाणी घालणं गरजेचं असतं.
जर तुम्ही रोपांना संध्याकाळी पाणी दिलं, तर कमी ऊन असल्याने ती रोपं रात्रभर पाण्यातच असतात. अशाने त्यांची मूळं सडू शकतात.
घरात लावलेल्या रोपांची मूळं अशीही मजबूत नसतात. त्यामुळे त्यांना सकाळी पाणी देणं जास्त योग्य असतं.
जर तुम्ही घराच्या बाल्कनीत छोट्याशा जागेत रोपं लावली असतील तर संध्याकाळी पाणी घालणं टाळा.
छोट्याशा जागेत पाणी जमा झाल्यास तिथे मच्छर येण्याची शक्यता वाढते.
जर तुमच्या रोपांची पानं मोठी असतील तर त्यांना जास्त पाण्याची गरज असते.
त्यातही तुम्ही थेट पाणी ओतू नका. पाणी घालण्यासाठी वॉटरिंग कंटेनर किंवा प्लास्टिकची बाटली घ्या.
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी घालताना त्याच्या झाकणावर छोटी छिद्र पाडा आणि नंतर पाणी घाला.
यामुळे पाण्याचा प्रेशर रोपांच नुकसान करणार नाही.