सिमेंटही नसताना त्या काळी कसा बांधला ताजमहाल? खरं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

Intern
Apr 25,2025


जगातील सर्वात सुंदर आणि भव्य इमारतींपैकी एक म्हणजे ताजमहाल. त्याचे सौंदर्य पाहून प्रत्येकजण हरखून जातो.


ही ऐतिहासिक इमारत मुघल सम्राट शाहजहान याने आपल्या पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ बांधली होती.


ताजमहालचे बांधकाम 1632 साली सुरू झाले आणि 1648 मध्ये पूर्ण झाले. तब्बल 16 वर्षांच्या कालावधीत हा महाल तयार करण्यात आला होता.


पण कधी तुम्ही विचार केला आहे का, त्या काळी आधुनिक सिमेंट नव्हते, तर ताजमहाल कशापासून बांधला गेला?


या भव्य इमारतीच्या बांधकामासाठी पारंपरिक भारतीय बांधकाम साहित्याचा वापर करण्यात आला होता.


त्यात मुख्यतः सुरखी चुना, लाल वाळूच्या विटा , गारगोटी चुना, चिकणमाती आणि वाळू अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर झाला होता.


हे मिश्रण त्या काळी अत्यंत टिकाऊ आणि मजबुत बांधकामासाठी वापरला जात असे.


ताजमहाल बांधण्यासाठी सफेद मकराना संगमरवर राजस्थानमधून आणला गेला होता. तो इतका उत्तम प्रतीचा आहे की आजही त्याचा तेजस्वीपणा कमी झालेला नाही.

VIEW ALL

Read Next Story