आयएएस चंद्रज्योती सिंह या 2020 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुळच्या पंजाबच्या असून बालपणापासूनच शिक्षणात हुशार आहेत.
दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.
दिवसाचे 6 ते 8 तास अभ्यास केला. परीक्षेवेळी हा वेळ वाढवून 10 तास अभ्यास केला.
1 वर्षे अथक मेहनत घेत पहिल्या प्रयत्नात त्या आयएएस बनल्या.
त्यांनी आपल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली.
2019 च्या यूपीएससी सीएसई परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया 28 वा रॅंक मिळवला.
या रॅंकनंतर त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवडण्यात आले.
सुंदर आयएएस अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.
यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी तुमच्याकडे एक मजबूत योजना असावी. सर्व परिस्थितीत तुम्ही त्यावर टिकून राहिलात तर यश तुमचंच आहे, असे त्या सांगतात.