कैदी जर तुरुंगातून पळून गेला तर त्याला अपराध मानलं जातं. ज्याची कठोर शिक्षा सुद्धा होऊ शकते.
जर भारतात कोणता कैदी तुरुंगामधून पसार झाला तर तर त्याच्यावर IPC कलमांतर्गत त्यांना ७ वर्षांची कैद आणि दंड होऊ शकतो.
तुरुंगातून पसार होणं हा भारतात अजामीनपात्र गुन्हा आहे.
पण एक असा देश आहे ज्याच्या तुरुंगातून कैदी पसार झाला तर तो गुन्हा मानला जात नाही.
जर्मनीच्या तुरुंगातून जर कोणता कैदी पळून गेला तर तेथे तो गुन्हा समजला जात नाही.
मानवी हक्क जर्मनीमध्ये स्वातंत्र्य हा मूलभूत मानवी हक्क मानला जातो, म्हणूनच जर एखादा कैदी तुरुंगातून पळून गेला तर तो गुन्हा मानला जात नाही.
पण तुरुंगातून पळून जाताना कैदीने कोणत्या प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्यावर खटला चालवला जातो.
कैदीने तुरुंगातून पळून जाताना कोणावर हल्ला केला किंवा तेथील संपत्तीला नुकसान पोहोचवले तर तो गुन्हा मानला जातो.