हे गाव खूप प्रसिद्ध असून या गावाला जुळ्या मुलांचे गाव म्हणून ओळखले जाते.
आज आम्ही तुम्हाला जुळी मुले जन्माला येणाऱ्या गावाबद्दल सांगणार आहोत.
हे गाव केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही गाव आहे.
जिथे 400 पेक्षा जास्त जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. या गावात जुळ्या मुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
या गावात जुळी मुले असण्याचा ट्रेंड गेल्या तीन पिढ्यांपासून सुरु आहे. या गावात 1000 मुलांपैकी 45 मुले जुळी जन्माला येतात.
याशिवाय या गावात 2008 मध्ये 280 जुळ्या मुलांचा जन्म झाला होता.