आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.
देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी याची तयारीदेखील सुरु झालीय.
आज आपण तिरंग्यासंदर्भातील काही गोष्टी जाणून घेऊया.
भारतीय तिरंगा केवळ एका जागीच बनवला जातो.
कर्नाटकच्या हुबळी शहरातील बेंगेरी भागातील KKGSS मध्ये बनतो.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून याला मान्यता आहे.
या यूनिटला हुबळी यूनिट म्हटले जाते.
KKGSS ची स्थापना 1957 मध्ये झाली. 2004-2006 पासून त्यांनी तिरंगा बनवायला सुरुवात केली.
लाल किल्ल्यापासून जिथे कुठे तिरंग्याचा अधिकृत वापर होतो.
त्यांना KKGSS कडून तिरंगा पुरवला जातो.