कुतूहल! आजच्या तुलनेत 1947 मध्ये सोन्याला गोळ्याबिस्कीटांचा भाव; तांदुळ- दुधाचे दर पाहून म्हणाल गेले ते दिवस....
1947 मध्ये तांदूळ 12 पैसे प्रति किलो इतक्या किमतीला विकले जात होते. आज त्यांचे दर 50 रुपयांपासून 150, 200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
तेव्हा 40 पैशांना एक किलोभर साखर मिळायची. आज तिचेच दर 50 रुपये किलो इतके आहेत.
1947 मध्ये बटाटे 25 पैसे प्रति किलो इतक्या किमतीला विकले जात होते. आज हे दर 30 रुपयांयवर आले आहेत.
दुधाचं सांगावं तर ते 12 पैसे प्रति लिटर इतक्या किमतीला विकलं जात होतं. आता मात्र हे दर 30 ते 60 रुपये प्रति लिटर रुपये इतके आहेत.
आश्चर्य वाटेल पण, तेव्हा पेट्रोल 25 पैसे प्रति लिटरला विकलं जात होतं. आता हे दर105 रुपये किंवा अनेकदा त्याहीपलीकडे जातात.
दळणवळणाचं साधन असणारी सायकल त्यावेळी 20 रुपयांना होती. हल्ली तेच दर 3000 आणि त्याहीपेक्षा जास्त आहेत.
त्या काळात विमान प्रवास म्हणजे आलिशान जीवनशैलीचं चिन्हं. यासाठी लोक माणसी 140 रुपये मोजत होते. आज हेच दर किमान 4000 रुपये आहेत.
58000 रुपयांना सध्या विकलं जाणारं एक तोळं सोनं त्या दिवसांमध्ये 88.62 रुपये म्हणजे डेरिमिल्क चॉकलेटपेक्षाही स्वस्त होतं. वाटतंय ना, त्याच दिवसांमध्ये परत जावंसं?