भारतात मुघल साम्राज्याचं अनेक वर्षांपर्यंत वास्तव्य पाहायला मिळालं.
संपूर्ण कार्यकाळात याच मुघलांनी काही अद्वितीय कलाविष्कार असणाऱ्या वास्तू आणि वस्तू साकारल्या.
इतिहासातील नोंदींनुसार मुघलांनी साकारलेली सर्वात महागडी वस्तू होती, तख्त-ए-ताऊस.
मयूर सिंहासन हे त्याचं दुसरं नाव. मुघल बादशाहा शहाजहां यानं ते तयार करून घेतलं होतं.
ताजमहालाहून अधिक महागडं असं हे सिंहासन मुघल साम्राज्याच्या श्रीमंतीचं प्रतीक होतं ज्यामध्ये मौल्यवान हिरे आणि धातूंचा वापर करण्यात आला होता.
साधारण सात वर्षांहून अधिक कालावधी खर्ची घालण्यात आला तेव्हा हे सिंहासन बनून तयार झालं.
त्या काळात सिंहासनाची किंमत ही ताजमहालाहून दुप्पट असून मुघल साम्राज्यातील ती सर्वात महागडी वस्तू होती. (सर्व छायाचित्र- फ्रीपिक)