स्वंतत्र्य भारताचं संसद भवन

स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसद भवनातून देशाचं संविधान लागू करण्यात आलं होतं.

May 24,2023

जुन्या वास्तूचं काय होणार?

ज्या वास्तूत अनेक कालातीत कायदे झाले, जिथून नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. नव्या संसद भवनानंतर त्या जुन्या इमारतीचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ब्रिटिश काळात बांधकाम

जुन्या संसद भवनाची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट सर एजविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती.

बांधकामासाठी सहा वर्ष

या इमारतीच्या बांधकामासाठी सहा वर्ष लागली. 1927 मध्ये जुन्या संसद भवनाची इमारत पूर्ण झाली.

इमारतीत संसद संग्रहालय

जुन्या संसद भवनाच्या इमारतीत 1956 साली दोन मजले वाढवण्यात आले. 2006 मध्ये या इमारतीत संसद संग्रहायलय तयार करण्यात आलं.

जुन्या इमारतीची डागडुजी

नव्या संसद भवन इमारतीनंतर जुन्या संसद भवनाच्या इमारतीची डागडुजी करुन पर्यायी रुपात त्याचा वापर करावा असं मत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेत मांडलं होतं.

देशाची पुरातत्व संपत्ती

सूत्रांच्या माहितीनुसार जुन्या संसद भवनाची इमारत पाडली जाणार नाही. कारण ही इमारत देशाची पुरातत्व संपत्ती आहे. संसदेशी संबंधीत काही कार्यक्रमांसाठी या इमारतीचा वापर केला जाईल.

इमारतीचं संग्रहालयात रुपांतर

2022 मधल्या एका अहवालानुसार जुन्या संसद भवनाच्या इमारतीचं संग्रहालयात रुपांतर केलं जाईल. सेंट्रल विस्टाच्या पुनर्विकास प्रोजेक्टअंतर्गत केंद्र सरकारची ही योजना असू शकते.

जुन्या इमारतीचं महत्त्व

संसदेची जुनी इमारत कौन्सिल हाऊस म्हणून वापरली जात होती आणि नंतर तिचे संसद भवनात रूपांतर करण्यात आलं.

नवी इमारत भव्य-दिव्य

आता असलेल्या जुन्या संसद भवनपेक्षा नवं संसद भवन तब्बल 1700 चौरस मीटर मोठे आहे. एकूण 64,500 चौरस मीटर जागेत ही इमारत उभारण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story