10 रुपयांच्या नाण्याचा बाहेरचा भाग/ वर्तुळ पिवळसर रंगाचं असतं. तर, आतलं वर्तुळ चांदीसम दिसतं.
नाण्याचे हे दोन्ही भाग वेगवेगळ्या धातूंपासून तयार होतात. ज्यामुळं नाणी मजबूत राहून दीर्घकाळासाठी टीकतात.
10 रुपयांच्या नाण्याचं एकूण वजन 7.71 ग्राम इतकं असतं.
नाण्याचा मध्यभाग 3.26 ग्रामचा असून आणि हा भाग कप्रोनिकल मेटलपासून तयार केला जातो.
या अंतर्गत भागामध्ये 75 टक्के तांबं आणि 25 टक्के निकेल धातू असतो.
नाण्याचा बाह्य भाग अॅल्युमिनिअम ब्राँझपासून तयार केला जातो. याचं वजन 4.45 ग्राम असून यामध्ये 92 टक्के तांब आणि 6 टक्के अॅल्युमिनिअमसह 2 टक्के निकेल असतं.