नौदल कोणत्याही देशाचं असो, त्याचं प्राथमिक कर्तव्य असतं ते म्हणजे देशाच्या सागरी सीमांचं शत्रूपासून रक्षण करणं आणि सागरी कटकारस्थानं उधळून लावणं.
कोणत्याही देशाच्या नौदलाचं स्थान हे त्यांची आधुनिकता, शत्रूवर मारा करण्याची त्यांची क्षमता, बचाव करण्याची पात्रता आणि ताकद यासोबतच आर्थिक पाठबळ या गोष्टींवर ठरतं.
2024 च्या क्रमवारीनुसार जगभरात अमेरिकेचं नौदल हे सर्वशक्तिशाली असून, त्याची गुणसंख्या आहे 323.
अमेरिकेमागोमाग चीन (319), रशिया (242), इंडोनेशिया (137) आणि पाचव्या स्थानी कोरिया (122.9) या देशांचा समावेश आहे.
या यादीत सहाव्या स्थानी जपान (121), सातव्या स्थानी भारत (100), आठव्या स्थानी फ्रान्स (92.9)चा समावेश आहे.
यादीत नवव्या स्थानी ब्रिटन (88.3) आणि दहाव्या स्थानी तुर्की (80.5) या देशांच्या नौदलांचा समावेश आहे.