नव्यानं पासपोर्ट काढण्याच्या विचारात असाल तर, लक्षात घ्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट विभागाकडून पारपत्र अर्थात पासपोर्ट नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
नियमांनुसार 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्म झालेल्या मुलांचा पासपोर्ट घेण्यासाठी त्यांच्या पालकांना आता जन्मतारखेसाठी जन्माचं प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.
पुढील काही महिन्यांत या बदलांची अंमलबजावणी सुरू होईल. नव्या बदलांनुसार पुढील पाच वर्षांत देशातील पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या 442 वरून 600 पर्यंत वाढवण्यात येईल.
बदललेल्या पासपोर्टच्या शेवटच्या पानावर यापुढे निकासी पत्ता यापुढे छापला जाणार नाहीय हे लक्षात घ्या.
छापील पत्त्याऐवजी इमिग्रेशन अधिकारी बार कोड स्कॅन करत पासपोर्टधारकाच्या पत्त्याबाबत माहिती मिळवतील.
पासपोर्टधारकांच्या पालकांची नावे यापुढे पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापली जाणार नाहीत. ज्यामुळं एकल पालकत्वं आणि विभक्त कुटुंबातील मुलांना दिलासा मिळून त्याबाबतची गोपनीयता राखली जाईल.