सर्वात छोट्या नावाचं भारतातलं रेल्वे स्थानक कोणतं माहितीये का? नाव समजल्यावर वाटेल आश्चर्य

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क

भारतातील रेल्वेचं जाळं हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

कानाकोपऱ्यात रेल्वे मार्ग

भारतीय रेल्वेचा पसारा एवढा मोठा आहे की आज देशातील कानाकोपऱ्यात रेल्वे मार्ग पोहोचले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

सर्वात स्वस्त पर्याय

भारतासारख्या मोठ्या देशामध्ये रेल्वे हा सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. त्यामुळेच रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

7,349 रेल्वे स्थानकं

भारतात एकूण 7,349 रेल्वे स्थानकं आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

सर्वात छोटं नाव असणारं रेल्वे स्थानक

मात्र भारतात असलेल्या या जवळपास साडेसात हजार रेल्वे स्थानकांपैकी सर्वात छोटं नाव असणारं रेल्वे स्थानक कोणतं हे तुम्हाला माहितीये का?

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

या प्रश्नाच उत्तर ठाऊक नाही

या रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनाच याबद्दलची कल्पना आहे. मात्र बहुतांश भारतीयांना या प्रश्नाच उत्तर ठाऊक नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

दोनच अक्षरं नाव

भारतामधील सर्वात छोटं नाव असलेल्या रेल्वे स्थानकाच्या नावात दोनच अक्षरं आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

गोवा वाटतं असेल तर तुम्ही चुकताय

आता तुम्हाला गोवा असं उत्तर वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात कारण गोवा नावाचं कोणतंही रेल्वे स्थानक नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

कोणतं आहे हे स्थानक

देशातील सर्वात छोट्या नावाचं रेल्वे स्थानकाचं नाव 'ईब' असं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

इंग्रजीत कसं लिहितात नाव?

ओडिशामध्ये असलेल्या या रेल्वे स्थानकाचं इंग्रजीमध्ये नाव IB असं लिहिलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

दोनच प्लॅटफॉर्म

ईब रेल्वे स्थानक हे नावाप्रमाणेच छोटसं आहे. या रेल्वे स्थानकावर दोनच प्लॅटफॉर्म आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

कधी बांधलेलं हे स्थानक?

1891 मध्ये हे स्थानक बांधण्यात आलं. या स्थानकापासून ईब नदी हाकेच्या अंतरावर असल्याने या स्थानकाला हे नाव देण्यात आलं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 17, 2025

VIEW ALL

Read Next Story