रात्री ट्रॅक दिसत नसतानाही लोकोपायलट योग्य मार्गावरुन ट्रेन कशी चालवतात?
Indian Railway : भारतीय रेल्वेतून दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासोबतच कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांचा आकडाही मोठा.
अशा या रेल्वेनं प्रवास करताना तुमच्या मनात काही प्रश्नांनी घर केलं आहे का?
रेल्वेच्या रुळंकडे पाहिल्यावर ते एकात एक गुंतल्याचं भासतं, मग हे लोको पायलट कशी बरं यातून वाट काढतात? तुम्ही कधी विचार केला आहे का?
लोको पायलटला यामध्ये मदत करतो होम सिग्नल. जो यासंदर्भातील माहिती लोको पायलटला देते.
एखादा रुळ एकाहून अधिक भागांमध्ये विभागला असेल, तर तो येण्यापूर्वी 300 मीटर आधीच होम सिग्नल सुरु केला जातो. तिथं एक लाईट लावलेला असतो.
होम सिग्नलमुळं लोको पायलटला योग्य सिग्नल मिळण्यासोबतच स्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठीसुद्धा सिग्नल देतो.