Indian Railway नं प्रवास करताना तिकीटावर सबसिडी कशी मिळवाल?
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना सुखकर प्रवासाची अनुभूती देण्यासाठी भारतीय रेल्वे तत्पर असून, त्याच अनुषंगानं कामही करताना दिसते. अशा या रेल्वेनं अनेकजण लांब पल्ल्याचा प्रवास करताना दिसतात.
नुकतंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या तिकीटाची अर्धी रक्कम भरली जाते.
जाणून आश्चर्य वाटेल, पण तुम्हाला रेल्वे तिकिटावर 45 ते 55 टक्के सबसिडी मिळते. थोडक्यात तुमचं तिकिट 100 रुपये असल्यास 45 रुपये तुम्हाला द्यावे लागतात.
तुम्ही कधी रेल्वे तिकीट काढलं आणि व्यवस्थित पाहिलं तर, तिथंही एक बाब नमूद असते, IR Recovers only 57% of cost on an average.
आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वे तिकीटावर इतकी सवलत देऊनही रेल्वेचा नफा मागील वर्षी 25 टक्क्यांनी वाढला होता.
मालवाहतूक आणि प्रवासी भाडं याव्यतिरिक्त रेल्वे विभाग प्लॅटफॉर्मवरील जाहिराती, स्टेशनवरील दुकानं, चित्रीकरणासाठी स्थानकाचा वापर या माध्यमातूनही गडगंड कमाई करतो.