रेल्वेच्या कोणत्या मार्गावर चादर, उशी जास्त चोरी होतात?


ट्रेनमध्ये मिळणाऱ्या चादर, उशी आणि ब्लॅंकेट लोक चोरुन नेतात. यामुळे रेल्वेला खूप मोठे नुकसान होते.


रेल्वेने यासंदर्भात गाइडलाइन जाहीर केल्या आहेत. त्यानुसार चोरी करताना कोणी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल.


चोरीच्या प्रकारामुळे रेल्वेचे लाखोंचे नुकसान झालंय.


समोर आलेल्या माहितीनुसार काही प्रवासी चमचा, किटली, नळ, वॉशरुममधल्या तोट्या चोरुन नेतात.


छत्तीसगडच्या बिलासपूर झोनच्या ट्रेनमध्ये लोकांनी रेल्वेचे खूप सामान चोरी केले.


बिलासपूर आणि दुर्ग या मार्गावरुन चालणाऱ्या एक्सप्रेसमध्ये चादर, ब्लॅंकेट, उशांचे कव्हर, फ्रेश टॉवेल टॉवेल चोरी झाले आहेत.


गेल्या वर्षीच्या 4 महिन्यात साधारण 56 लाखांचे सामान चोरीला गेले आहे.


यात 12 हजार 886 फेस टॉवेल, 18 हजार 208 चादर, 19 हजार 767 उशांचे कव्हर, 2796 ब्लॅंकेट तर 312 उशी चोरीला गेल्या.


सामान चोरी करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रॉपर्टी कलमाअंतर्गत कारवाई केली जाते.


आरोपीला दंड आणि शिक्षा केली जाते. यात आरोपीला 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story