IRCTC किंवा कोणत्याही इतर तिकीट बुकिंग अॅपवर नोंदणी करा. प्रवासाच्या 120 दिवस आधीच तिकीटाचं नियोजन करा. यासाठी तारखा पाहून घ्या.
IRCTC च्या नव्या फिचरनुसार तुम्ही तुमची माहिती आधीच भरू शकता, जेणेकरून तात्काळ तिकीट सहज काढता येते.
स्लीपर आणि 3AC ऐवजी तिकीट बुक करताना 2AC, 1 AC असे पर्याय निवडा. इथं तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अधिक असते.
रात्री उशिरा किंवा पहाटे तिकीट बुक केल्यास युजर कमी असल्यामुळं ते सोप्या पद्धतीनं बुक होतं आणि कन्फर्मही होण्याची शक्यता असते.
सणावारांना अगदी शेवटच्या क्षणी प्रवासाचा बेत ठरल्यास तात्काळ तिकीट काढा. सकाळी 10 वाजता AC आणि 11 वाजता स्लीपर क्लासचं तिकीट तुम्ही बुक करू शकता.
रेल्वेकडून प्रवासाच्या एक- दोन दिवस आधी काही प्रिमीयम तिकीटही जारी केले जातात. त्यामुळं असे तिकीटही बुक करणं सोपं जातं. अनेक वेबसाईट ट्रेन तिकीट बुकिंगवर सवलतीही देतात त्यामुळं तुमचं चौफेर लक्ष असणं गरजेचं.