सरकारी नोकरीची तयारी करणारे अनेक तरुण इंडियन रेल्वेत नोकरीसाठी धडपडत असतात.
रेल्वेमध्ये विविध पदांची भरती निघते. पण टीटीईची नोकरी तरुणांच्या जास्त आवडीची असते. पण टीटीईची नोकरी कशी मिळते? जाणून घेऊया.
भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी टीटीई पदासाठी भरती केली जाते.
इच्छुक आणि पात्र उमेदवार नोटिफिकेशन पाहून अर्ज करु शकतात.
यानंतर उमेदवारांना दिलेल्या वेळेत परिक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागते. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही टीटीई बनू शकता.
टीटीई परीक्षेत जनरल नॉलेज,गणित आणि रिजनिंगचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उमेदवारांनी या विषयांची चांगली तयारी करायला हवी.
टीटीई परीक्षेत एकूण 150 प्रश्न विचारले जातात. यामध्ये गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जनरल रिजनिंगचे प्रश्न असतात. काही रेल्वे संदर्भातीलही प्रश्न असतात.
150 प्रश्नांची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना विशिष्ट ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते. यानंतर त्याचा कार्यकाळ सुरु होतो.
टीटीई बनण्याची इच्छा असणाऱ्यांना बारावीत 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
टीटीई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
टीटीई पदावर निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार, दरमहा 9 हजार 400 ते 35 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.
यासोबतच 1900 रुपये ग्रेड पे, डीए, एचआरए आणि इतर भत्ते मिळतात. टीटीई आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना ट्रेनचा मोफत प्रवास करण्याची सुविधा असते.