भारतात जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. जिथे रोज 11 रेल्वे चालतात.
भारतातील सिंघाबाद रेल्वे स्टेशन ओसाड स्थानक आहे. जे बांग्लादेश बॉर्डरवर आहे. जिथे ट्रेन जातही नाहीत, निघतही नाहीत.
हे भारतातलं शेवटचं स्थानकं म्हटलं जातं. बंगालमधील मालदा जिल्ह्याच्या हबीबपूर क्षेत्रात येतं.
समृद्ध इतिहास असूनदेखील सिंघाबाद रेल्वे स्थानक अपुऱ्या सुविधांमुळे ओसाड दिसतं.
कधी काळी इथे वर्दळ असायची पण आता काही कर्मचारीच येथे कार्यरत आहेत.
1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर येथे रेलचेल वाढली. 1978 मध्ये दोन्ही देशात सामंजस्य करार झाला. ज्यानंतर सिंघाबादवरुन मालगाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली.
सिंघाबाद रेल्वे स्थानक भारताच्या इतिहासाचा एक आकर्षक भाग आहे.