आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोक नवनवीन प्रयोग करत आहेत.
100 वर्षानंतर भारतातील ग्रामीण भाग कसा दिसेल? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
गाव म्हटलं की शेत आणि जुनी घरे डोळ्यासमोर येतात. पण एआयचा कल्पनाविस्तार वाखाणण्याजोगा आहे.
आपण कल्पनाही करु शकत नाही, असे गावचे फोटो एआयने दाखवले आहेत.
सध्या शेकडो गाव असे आहेत, ज्यात चांगले रस्ते नाहीत. राहायला घरे नाहीत.
पण एआयचे फोटो पाहून हे ग्रामीण तर शहरी भाग आहे,असे तुम्हाला वाटेल.
एआयने गावात ऊंच इमारती असल्याचे दाखवले आहे.
गावाच्या मधोमध एक अत्याधुनिक ट्रेन चालताना दिसत आहे.
तसेच रस्त्यावर अनेक हायटेक टॅक्सी धावताना दिसत आहेत.
सर्व फोटो एआयच्या कल्पनेवर आधारित आहेत. प्रत्यक्षात काय होईल सांगता येत नाही.