भारतातील ट्रेनचा इतिहास खूपच विशाल आहे. ट्रेनच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर प्रवाशांना उष्णतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी ट्रेनमध्ये एसी बसवण्यास सुरुवात झाली.
उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, 1 सप्टेंबर 1928 रोजी भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच एसी बसवण्यात आला.
'पंजाब मेल' ही भारतातील पहिली एसी ट्रेन होती. ब्रिटीश काळात ट्रेनमध्ये एसी बसवण्यास सुरुवात झाली.
'पंजाब मेल'ला सुरुवातीला 'पंजाब लिमिटेड' असे म्हटले जात होते.
ही ट्रेन पूर्वी मुंबईहून निघायची आणि इटारसी, आग्रा, दिल्ली, लाहोर मार्गे पेशावर कॅन्टला पोहोचत असे.
पंजाब मेलला तिच्या विलक्षण वैशिष्ट्यांमुळे देशातील पहिल्या डिलक्स ट्रेनचा दर्जा मिळाला.
ब्रिटिश काळातील ही सर्वात वेगवान ट्रेन मानली जात होती. सुरुवातीला ही ट्रेन ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी वापरली जात होती.
सुरुवातीला पंजाब मेल ब्रिटिशांसाठी चालवली जात होती, पण नंतर सामान्य लोकांसाठी तृतीय श्रेणीचे कोच जोडण्यात आले.