जाळी विनणाऱ्या कोळीचा चेहरा अगदी जवळून फारस विचित्र दिसतो. अनेक कोळ्यांना चार डोळे असल्याचं समोर आलं आहे.
रक्तपिपासू मच्छरांमुळे अनेक आजार होतात. डेंग्यू, मलेरिया अशा अनेक आजारांचा धोका असतो. मच्छर चावणं जितकं धोकादायक असंत तितकाच त्यांचा चेहराही भयानक आहे.
बिछाने बराच काळ धुतले नाही तर त्यात छोटे-छोटे किडे होतात आणि ते आपल्याला चावतात. हे किडे झुम करुन पाहिल्यास असे दिसतात.
पावसाळा आला की घरात माशा घोंघावायला लागतात. लहान मुलं हाताने माशी पकडून बाटलीत बंद करतात. पण या माशीचा जवळून चेहरा पाहिला तर घाम फुटेल.
केसांची काळजी घेतली नाही तर केसात उवा होतात. बोटाच्या नखाने ऊ मारतो. पण कधी विचार केला आहे का अगदी तिळाच्या दाण्याइतकी ऊ दिसते कशी.
झुरळ पाहिल्यावर कोणालाही किळस येते, झुरळाला आपण घाबरतोही तितकेच. पण झुरळाचा चेहरा अगदी जवळून पाहाला तर तुम्ही आणखीनच घाबरलाय.
छान किती दिसते फुलपाखरू, विविधरंगी, मनमोहक फुलपाखरू सर्वांनाच आवडतं. पण फुलपाखराचा चेहरा झुम केल्यावर असा दिसतो
मुंगी दिसायला अगदी लहानशी असली तरी तिचा चेहरा अगदी भयानक दिसतो. एखाद्या हॉरर चित्रपटातील पात्रासारखा भयावह असा मुंगची चेहरा दिसतो.