तब्बल 560 किलो सोन्याने मढवलेल्या 4000 कोटींच्या घरात राहतो 'हा' भाजपा नेता; भव्यता पाहून व्हाल थक्क

आलिशान महलात राहतात हे खासदार

सध्याच्या सरकारमध्ये असणारे केंद्रीय मंत्री तसेच खासदार ज्योतिरादित्य शिंदे हे राजघराण्याचे सदस्य आहेत. ते आलिशान महलात राहतात.

महत्त्वाच्या बैठका

ज्योतिरादित्य शिंदेंच्या मालकीच्या महलामधील दरबार हॉलमध्ये राजघराण्यातील महत्त्वाच्या बैठका व्हायच्या.

राजेशाही थाट अन् सोनं

या हॉलला सजवण्यासाठी 560 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्यातूनच त्याला राजेशाही थाट दिसून येतो, असं डीएनएने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आठ हत्तीचा वापर

दरबार हॉलच्या छप्पराचा मजबूतपणा तपासून पाहण्यासाठी आठ हत्तीचा वापर करण्यात आला होता असं सांगतात.

झुंबरांचं वजन सहज पेलता येतं

त्यामुळे या महलातील हॉलमधील छप्पर मोठमोठ्या झुंबरांचं वजन सहज पेलू शकतं. अशी काही झुंबरं येथे टांगलेली आहेत.

टेबलवर छोटा रेल्वे ट्रॅक

या महलामधील डायनिंग टेबलवर मध्यभागी खेळण्यातील रेल्वे ट्रॅकप्रमाणे ट्रॅक असून यावरुन चांदीची एक छोटी ट्रेन धावते. या ट्रेनमधून पाहुण्यांना वेगवेगळे पदार्थ वाढले जातात.

महालामध्ये संग्रहालय

या महलामधील एकूण 35 खोल्यांमध्ये राजवाड्यासंदर्भातील संग्रहालय साकारण्यात आलं आहे.

अनेक गोष्टींचा समावेश

शिंदे घरण्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी ज्यामध्ये आलीशान कार्स, वेगळं फर्निचर आणि हत्यारांचा समावेश आहे.

यासाठी बांधलेला हा महाल

जय विलास नावाचा हा महाल 1876 साली प्रीन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस मेरी ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आला होता.

बांधण्यासाठी किती खर्च झाला?

19 व्या शतकामध्ये जय विलास महाल बांधण्यात आला तेव्हा त्याची किंमत 1 कोटी रुपये इतकी होती.

आताची किंमत किती?

आता जय विलास महालाची किंमत 4 हजार कोटींहून अधिक आहे.

सध्या मालकी ज्योतिरादित्य शिंदेंकडे

सध्या या जय विलास महालाची मालकी वंश परंपरेनुसार ज्योतिरादित्य शिंदेंकडे आहे.

अभिवाज्य भाग

आजही वापरात असलेला हा जय विलास महाल इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे.

इतिहासातील एक महत्त्वाचं पान

जय विलास महाल हा केवळ ज्योतिरादित्य शिंदेंचं घर नसून भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पान आहे.

राजेशाही इतिहासाचं मूर्तीमंत उदाहरण

जय विलास महाल ही वास्तू म्हणजे कला, स्थापत्यशास्त्र आणि राजेशाही इतिहासाचं मूर्तीमंत उदाहरण आहे.

VIEW ALL

Read Next Story