Sudha Murthy inspiring quotes : सुधा मूर्ती कायम म्हणतात, 'कोणतीही कृती न करता बाळगलेलं ध्येय्य हे क्वचितच एखादं स्वप्न असतं. तर, कोणत्याही ध्येय्याशिवाय केलेली कृती वेळ व्यर्थ घालवण्याजोगी असते. पण, ध्येय आणि कृतीमध्ये एकत्रितरित्या जग बदलण्याची ताकद असते'.
'स्वत:ला जे आवडतं ते करणं म्हणजे स्वातंत्र्य आणि तुम्ही जे करताय ते आवडणं म्हणजे आनंद'
'सहसा जे व्यक्ती संवेदनशील असतात त्यांना खरं जग कळायला वेळ लागतो.'
'सर्वांनाच आनंदात ठेवण्याचा विचार केला तर, तुम्ही कोणालाही आनंदी ठेवू शकत नाही. इतरांच्या आनंदासाठी स्वत:चं आयुष्य जगणं शक्यच नाही.'
'आगीला आगच मिटवू शकत नाही, तिथं पाणीच काय तो फरक पाडू शकतं.'
'महिला आणि पुरुषांसाठी खास मित्र कोण? उत्तर आहे एका पत्नीसाठी पती आणि एका पतीसाठी त्याची पत्नी'
'आपल्या आयुष्यात किमान एक तरी ध्येय असायलाच हवं. ज्याच्या पूर्ततेदरम्यान आपण इतरांनाही मदत करू शकू.'
'लग्नानंतरचं आयुष्य म्हणजे युद्ध आहे. फार कमी मंडळी नशिबवान असतात.'
'एकाकीपणा आणि एकटेपणामध्ये फार फरक आहे. एकाकीपणा कंटाळवाणा असतो. एकाकीपणामध्ये तुम्हाला तुमच्याच विचारांची चाचपणी करण्याचा वेळ असतो.'